Hot Posts

6/recent/ticker-posts

देशाला नवीन संसद भवनाची नव्हे नव्या पंतप्रधानांची गरज संभाजी ब्रिगेड आढावा बैठकीत खेडेकरांचे प्रतिपादन

 देशाला नवीन संसद भवनाची नव्हे नव्या पंतप्रधानांची गरज संभाजी ब्रिगेड आढावा बैठकीत खेडेकरांचे प्रतिपादन

अकोला (कटूसत्य. वृत्त.): देशाला नवीन संसद भवनाची नव्हे तर नव्या पंतप्रधानांचीच गरज आहे. मोदींनी शेतकरी आणि सामान्य माणूस गेल्या साडेपाच वर्षात भिकेला लावून उद्योगपती अधिक बळकट केले आहेत असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी आज येथे व्यक्त केले. स्थानिक मराठा सेवा संघाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशाेक पटाेकार हे हाेते.

संभाजी ब्रिगेडने राज्यातील सर्व ग्राम पंचायत निवडणुका एकट्याने लढविण्याचे ठरविले असून गावातही उत्तम कारभार होऊ शकतो हे अनुभवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन खेडेकर यांनी बैठकीत केले.

कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या विवीध आघाड्यांच्या नवनियुक्त पदाधीकार्यांना सौरभ दादांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भारसाकळ यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एकनाथ खेळकर यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments