नरखेड ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होईल - पाटील

नरखेड (कटूसत्य. वृत्त.): अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असून ती पुसून काढण्यासाठी नरखेड गाव बिनविरोध होणे गरजेचे आहे. गावातील सर्वांनी एकत्रित बसून ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावाच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी मी कटिबद्ध असून राज्यात एक आदर्श गाव म्हणून नरखेडची ओळख निर्माण करू असे प्रतिपादन राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते जि. प. सदस्य उमेश पाटील यांनी केले. नरखेड ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने क्रांती लॉन्स येथे दुसरी बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना उमेश पाटील बोलत होते.
यावेळी दिलीप धोत्रे बोलताना म्हणाले की, नरखेड गाव बिनविरोध झाल्यास स्वतः पाच लाख रुपये बक्षीस म्हणून देणार असून इतरांनीही पुढे येऊन निवडणुकीला होणारा खर्च टाळून गावाच्या विकासासाठी निधी देण्यासाठी पुढे आले पाहिजे. गावच्या विकासासाठी बिनविरोधचा पर्याय चांगला आहे तरी त्याचा सर्वांनी एकत्रित येत अंमल करावा असे आवाहन केले.
यावेळी सिमाताई पाटील, रमेश बारसकर, मानाजी बापू माने, राजेंद्र मोटे, वसंत लवंगे, दिनेश नरळे, अनुप देशमुख, बाळासाहेब पाटील, रावसाहेब देशमुख, राहुल कसबे यांच्यासह आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. नरखेड गावातील सर्वजण आपा आपले गट तट, राजकीय पक्ष, वैयक्तिक मतभेद बाजूला ठेऊन एकत्रित आल्याने ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची खात्री उपस्थितामधून व्यक्त केली जात होती.
या बैठकीस मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, भाजपचे नेते संतोष पाटील,प्रमोद गरड, माजी प.स. सदस्य विनयकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, अरुण पाटील, सीमाताई पाटील, शहाजी मोटे, रावसाहेब देशमुख, डॉ. उमेश मेंडगुळे, डॉ वसंतराव लवंगे, बी.एस. पाटील, हरिभाऊ खंदारे, दिलीप मोटे, उपसरपंच लक्ष्मण राऊत, बाळासाहेब पाटील, विनोद पाटील,रमेश मोटे, विशाल गुंड, उत्तम मोटे, बापू भडंगे, धर्मराज जाधव, प्रकाश राऊत, शहाजी मस्के, प्रदीप पाटील, राहुल कसबे, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय सोनार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचलन अशोक धोत्रे यांनी केले तर आभार सुधाकर काशीद यांनी मानले.
गावातील नागरिक, सर्व पक्षाचे नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन नरखेड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून गावच्या भविष्यातील विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले.
0 Comments