Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्य सरकारने मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करू नये- धैर्यशील मोहीते पाटील

राज्य सरकारने मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करू नये- धैर्यशील मोहीते पाटील

अकलूज (कटूसत्य. वृत्त.): मराठा समाज एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला पात्र असताना सरकारने EWS प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याचा सोपा मार्ग निवडला आहे. परंतु राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे EWS आरक्षण देऊन केवळ स्वत:ची सोय पाहिली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा खटला पराभवाच्या दिशेने ढकलण्यासारखे आहे अशी गंभीर टिका करून राज्य सरकारने मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करू नये असे प्रतिपादन भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत EWS प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWS चा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये. याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? मराठा समाजाला EWS च्या सवलती लागू केल्या म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयात याच सवलतींचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाऊन मराठा आरक्षण विरोधकांना राज्य शासनने संधी दिली आहे व EWS च्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सरकारने पळवाट शोधली आहे.

मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले, ४८ लोकांनी बलिदान दिले ते SEBC आरक्षणासाठी. राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यावर लक्ष केंद्रित करावे ना की मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करू नये. नाहीतर याचे गंभीर परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील असा इशारा यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments