Hot Posts

6/recent/ticker-posts

येत्या काळातही मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव वचनबद्ध राहू - संतोषदादा सुरवसे आणि रोहित अण्णा फडतरे यांची ग्वाही

 येत्या काळातही मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव वचनबद्ध राहू - संतोषदादा सुरवसे आणि रोहित अण्णा फडतरे यांची ग्वाही


स्वच्छ मोहोळ सुंदर मोहोळ संकल्पना यशस्वी केल्याचे कृतार्थ समाधान..

          मोहोळ (कटूसत्य वृत्त): मोहोळ शहरातील सुजाण मतदार बंधू-भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवत दिलेल्या सत्तेच्या संधीच सोनं विकासाच्या रूपात करण्यामध्ये आम्हा सर्व राष्ट्रवादी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे मोहोळ शहरातील रस्ते पाणी आरोग्य वीज इत्यादी समस्या सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ मध्ये मी आणि संतोष दादा सुरवसे यांच्या या सहकार्याने प्रथम महिला नगराध्यक्ष सरिताताई संतोष सुरवसे आणि मनीषाताई विक्रम फडतरे या दोन्ही नगरसेवक भगिनींनी प्रभागातील अनेक वर्षांपासूनचे मुलभूत सुविधांचे प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यामध्ये यश मिळवु शकलो आहे. या पुढील काळातही मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या परिसरातील प्रभागात आम्ही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी एकदिलाने प्रयत्नशील राहणार आहोत अशी ग्वाही मोहोळचे राष्ट्रवादीचे युवा नेते तथा राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक रोहित अण्णा फडतरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मोहोळ शहराच्या पूर्व भागातील राष्ट्रवादीचे अभ्यासू नेते संतोषदादा सुरवसे हे देखील उपस्थित होते.

          नगराध्यक्ष सरिता ताई सुरवसे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ मोहोळ आणि सुंदर मोहोळ या आदर्शवत उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.आपले मोहोळ शहर नियमितपणे स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी मोहोळ शहरामध्ये विविध योजना व प्रकल्प मंजूर करून आणले. यामध्ये घरोघरी तयार होणारा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी प्रथमच चालू केली. यामध्ये शहरातील अनेक भागातील कचरा सातत्याने दररोज गोळा केला जात असून शहरातील नागरिकांच्या त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे रोहित अण्णा फडतरे यावेळी म्हणाले. प्रथम महिला नगराध्यक्ष सरिताताई सुरवसे यांच्या संकल्पनेतून दिसता कचरा फोटो पाठवा ही मोहीम अत्यंत अभिनवपणे राबवण्यात आली. यामध्ये नागरिकांच्या स्वच्छतेसंबंधीच्या तक्रारीचे निवारण एका तासात होत असल्याने शहरात कुठेही कचरा ढिग अस्ताव्यस्तपणे आढळून येत नाही. त्यामुळे स्वच्छ मोहोळ सुंदर मोहोळ या संकल्पनेला शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे रोहित फडतरे यावेळी म्हणाले.

          यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते संतोष सुरवसे म्हणाले की वार्ड क्रमांक आठ आणि नऊच्या सर्वांगीण विकासासाठी सुरुवातीपासून आम्ही वचनबद्ध आहोत. आपल्या मोहोळ शहरातील सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी पाण्याच्या प्रश्नोत्तरे स्वच्छता करणारी मशीन नगरपरिषदेच्या वतीने मागवण्यात आले आहे. त्याचबरोबर मोहोळ शहरांमध्ये यात्रा समारंभ लग्न कार्यालय इतर धार्मिक कार्यक्रमासाठी फिरत्या शौचालयाची ही मागणी प्रशासन  स्तरावरून आम्ही पूर्ण करून आणली आहे. त्याचबरोबर मोहोळ शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी दोन ट्रॅक्टर माऊंटेड डम्पिंग गाड्या देखील अद्यावत पणे सेवेत रुजू आहेत. असेही यावेळी त्यांनी सांगितले.

          नगराध्यक्षा सरिता सुरवसे यांनी प्रथम महिला नगराध्यक्षापदाच्या कालावधीत पूर्वीपासूनच स्वच्छता कर्मचारी आणि इतर स्वच्छता सेवक बांधवांच्या पगारीचा ग्रामपंचायत आणि नगरपरिषद फंडावर येणारा भार नागरिकांच्या घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये कोणतीही दरवाढ न होऊ देता शासनाच्या १४ व्या वित्त आयोगातून करण्याची विशेष बाब शासनाकडून मंजूर करून आणल्यामुळे कर्मचारी बांधवांना दिलासा मिळाला आहे. मोहोळ शहरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी बारा एकर जागा शासनदरबारी पाठपुरावा करून नगरपरिषदेच्या नावे करण्यात आले असून येत्या काळात या जागी पाच कोटी रुपयांचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहणार आहोत. घाटणे रोड येथील कचरा डेपो येथे मैला प्रक्रिया प्रकल्प म्हणजे एफएसटीपी बांधण्यात आला असून प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ मधील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशीन आम्ही स्वखर्चातून आणणार आहोत. - संतोष सुरवसे (राष्ट्रवादी युवा नेते)

Reactions

Post a Comment

0 Comments