Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगर परिषदेच्या जाहिराती जमिनीपासून पाच फूट उंचीवर लावण्याची युवा भीम सेनेची मागणी

मोहोळ नगर परिषदेच्या जाहिराती जमिनीपासून पाच फूट उंचीवर लावण्याची युवा भीम सेनेची मागणी

मोहोळ (कटुसत्य वृत्त): मोहोळ नगरपरिषदेने भिंतीवर लावलेल्या जाहिरातीवर नागरिक लघुशंका करीत असल्याने मोहोळ नगर परिषदेने जाहिराती जमिनीपासून पाच फूट उंचीवर लावण्याची मागणी युवा भीम सेनेचे जिल्हा अध्यक्ष युवराज सकट यांनी निवेदनाद्वारे मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी के.न.पाटील यांच्याकडे केली आहे.

मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान चालू असून सदर स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा या उदेशाने त्यांचे जाहिरात भिंती रंगवून केली जाते.यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणच्या जाहिराती जमिनीस लागून न करता त्या पाच फुटाच्या वरील बाजूस करणे अपेक्षित आहे. परंतु सदरच्या जाहिराती या भिंतीवर जमिनीस लागून आहेत. त्याचाच एक भाग म्हणूजे मोहोळ शहरातील हीरो शोरूमच्या शेजारी शहा यांच्या दवाखान्याची भिंत, अगर शहा इस्टेटची भिंत शिमोलघन पांद रोड येथील भिंतीवर तसेच शहरातील इतर ठिकाणच्या भिंतीवर असलेल्या जाहिरातीतीलअशोक चक्राच्या चिन्हावर लघुशंका अश्लाघ्य कृत्ये ग्रामीण भागातील लोक करीत आहेत. सदरची कृत्ये ही बेकायदेशीर व राष्ट्रहिताच्या विरुद्ध आहे. त्यामुळे सदरच्या जाहिराती या ताबडतोब जमिनीपासून किमान पाच फूट उंचीवर पुर्नरंगवून घ्याव्यात जेणेकरून अश्लाघ्य कृत्ये पुनच्च होणार नाहीत याची दखल घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जिल्हा अध्यक्ष युवराज सकट, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब भिसे,शहर उपाध्यक्ष विजय बनसोडे, गणेश भालेराव आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments