Hot Posts

6/recent/ticker-posts

वैराग मध्ये सोन्याच्या दुकानात चोरी १३लाखाचा ऐवज लंपास

वैराग मध्ये सोन्याच्या दुकानात चोरी १३ लाखाचा ऐवज लंपास

बार्शी (कुटूसत्य. वृत्त.): तालुक्यातील वैराग येथील चंद्रकांत गोविंद गोवर्धन या सोन्याच्या दुकानात बुधवार दिनांक २३ डिसेंबर ते गुरुवार दिनांक २४ डिसेंबर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दुकान फोडून १३ लाख रुपयांचा ऐवज   लंपास केल्याची घटना घडल्याने  परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत विनय चंद्रकांत गोवर्धन यांनी पोलिसात फिर्याद दिली असून वैराग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गांधी चौकातील विनय चंद्रकांत गोवर्धन यांचे चंद्रकांत गोविंद गोवर्धन या नावाने सोन्या-चांदीचे दुकानातून या दुकानात गुरुवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे  तीन चॅनल गेट तोडून दुकानात प्रवेश केला . दुकानातील सोने-चांदी व रोख रक्कम असा सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे .या चोरीच्या तपासासाठी सोलापूर येथील श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने दुकानात पासून संतनाथ मंदिरापर्यंत चोरट्यांचा माग काढला व त्याच ठिकाणी ते घुटमळणे तर ठसे तज्ञांनी घेतले आहेत . सोडणी सीसीटीव्ही वायर कापून दुकानात प्रवेश केल्याचे निदर्शनाला आले.

विशेष म्हणजे २००६ सली याच दुकानात भरदिवसा दरोडा पडला होता .त्यावेळी सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता तर गेल्या वर्षी असलेल्या सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी जागी होती. गुरुवारी गुरुवारी पहाटे चोरी होऊनही पोलिसात गुरुवारी रात्री९ पर्यंत वैराग पोलिसात  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Reactions

Post a Comment

0 Comments