Hot Posts

6/recent/ticker-posts

सिंहगड पब्लिक स्कूलचा प्रणित कोरे राज्यात सातवा ; माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले यश

 सिंहगड पब्लिक स्कूलचा प्रणित कोरे राज्यात सातवा ; माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले यश

पंढरपूर (कटूसत्य. वृत्त.): कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलितसिंहगड पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी प्रणित अनिल कोरे याने फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हात प्रथम व राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.

शाळेने यावर्षीही विविध परीक्षेतून आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तरी ही परंपरा कायम ठेवण्यासाठी या स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबिवले जात असतात. या यशाबद्दल स्कूल च्या प्राचार्या सौ. स्मिता नवले मुख्याध्यापिका सौ.स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments