वाढदिवसादिवशी उलगडणार शरदचंद्र पवार यांचा जीवनपट..!


उद्या सांगोल्यात शरदचंद्र पवार यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन
सांगोला (कटूसत्य. वृत्त.): देशाच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे प्रेरणास्त्रोत म्हणून सर्वपरिचित असलेल्या पद्मविभूषण खा. डॉ. शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र एकाच वेळी सकाळी 11 ते दु. 2 वा. च्या दरम्यान त्यांच्या जीवनपटाचे सर्वत्र प्रदर्शन होणार आहे. यानुसार उद्या शनिवार दि 12 डिसेंबर रोजी नियोजित वेळेत सांगोला येथील सांगोला महाविद्यालय सांगोला येथे या जीवनपटाचे प्रदर्शन होईल,अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांनी दिली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सध्या देशभर कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन तसेच औद्योगिक क्षेत्रात आलेल्या प्रचंड मंदीमुळे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.डाॅ. शरदचंद्रजी पवार यांनी आपला यंदाचा 80 वा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण आयुष्यभर सामान्य नागरिक व विशेषतः शेतकरी केंद्रस्थानी मानून विद्यार्थीदशेपासूनच देशात आणि राज्यात राजकारण व समाजकारणात सक्रिय असणाऱ्या मा.खा.डाॅ. शरदचंद्रजी पवार यांचा राजकीय प्रवास हे देशातील नागरिकांना न उलगडलेले कोडेच आहे. अशा तरुणांसह सर्वांसाठीच प्रेरणादायी असलेल्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व अर्थातच मा.खा. डाॅ. शरदचंद्रजी पवार यांचा जीवनपट शरदचंद्रजी पवार यांच्यावर निरातिशय प्रेम करणारे कार्यकर्ते,तरूण कार्यकर्ते व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत यांना दाखविण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा व वेळेत सांगोला महाविद्यालय सांगोला येथे उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments