युवा नेते अमोल पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे मंगळवारी आयोजन

"शोध युवा कर्तृत्वान नेतृत्वाचा" या अंतर्गत होणार मुलाखत
सांगोला (कटूसत्य. वृत्त.): सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनेल आणि दैनिक कटुसत्य यांच्या वतीने "शोध युवा कर्तृत्वान नेतृत्वाचा" या विशेष उपक्रमातर्गत सोलापूर जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात छाप पडणाऱ्या युवा नेतृत्वास चालना देण्याच्या उद्देशाने युवा नेत्याची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. या अंतर्गत यलमार मंगेवाडी ता-सांगोला येथील माजी सरपंच अमोल पाटील यांची मंगळवार दिनांक-१४ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रकट मुलाखत होणार आहे. ही प्रकट मुलाखत दैनिक कटुसत्य व वृत्तदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक पांडुरंग सुरवसे घेणार आहेत.
सोलापूर जिल्हयातील युवा नेतृत्वाचा शोध घेऊन त्यांची प्रकट मुलाखतीद्वारे सर्वांना ओळख व्हावी,हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे या आयोजित केलेल्या कार्यक्रमास यलमार मंगेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन अमोल पाटील मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments