शिक्षण विभागाकडून दिव्यांग दिन साजरा

3 ते 9 डिसेंबर या काळात दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे केले आयोजन
सांगोला (क.वृ.): पंचायत समिती शिक्षण विभाग सांगोला, यांच्यावतीने वेळापूर डायट यांच्या आदेशानुसार 3 ते 9 डिसेंबर या काळात दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.आज शिक्षण विभागात जागतिक दिव्यांग दिन साजरा केला.या वेळी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव, शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीपकुमार करडे, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या वेळी BRC टीम,तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.
दिव्यांग दिनाच्या निमित्ताने कोळा हायस्कूलमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी UDID ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, कॅम्प आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे. जागतिक दिव्यांग सप्ताहनिमित्त विविध स्पर्धेचें आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांनी जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा,असे आवाहन पालक, शिक्षक व IED टिम यांना केले आहे.
0 Comments