करकंब येथे आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा

करकंब (ऋषीकेश वाघमारे)(क.वृ.): करकंब येथे अपंग बंधूंचा सत्कार करून अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी करकंबचे माजी सरपंच मारुती अण्णा देशमुख, बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती सदस्य राहुल काका पुरवत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिंदे,तसेच करकंब मधील सर्व अपंग बंधू उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषद कडून राबविण्यात येणाऱ्या अपंगांसाठीच्या योजना आपल्या गावातील अपंगांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. अजूनही या योजनेपासून कोण राहिले असेल तर त्यांना ही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,असे सांगून अपंगांना शुभेच्छा दिल्या.या वेळी अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments