सांगोला येथे महाविकास आघाडीचा विजयोत्सव साजरा ; मतदारांचे मानले आभार


सांगोला (क.वृ.): पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीचे अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातुन जयंत आसगावकर हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत.त्या विजयाच्या प्रित्यर्थ सांगोला शहर आणि तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी विजयोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या मोजक्याच कार्यकर्त्यांनी सांगोला शहरातील सर्व महापुरुषाच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.आणि सर्व मतदारांचे आभार मानले.
पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातुन जयंत आसगावकर हे मोठया फरकाने विजयी झाले,त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या सुशिक्षित मतदारांनी प्रयत्न केला, त्या सर्वांचे आभार मानतो. महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी ज्या संस्था चालक, शिक्षक, पदवीधर, सर्व नेतेमंडळी यांच्या प्रयत्नातून हा विजय मिळाला आहे - प्रा पी.सी.झपके
0 Comments