Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकनेते कारखाना दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या दोन कामगार बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत

लोकनेते कारखाना दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या दोन कामगार बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत

चेअरमन बाळराजे पाटील यांच्या उपस्थीतीत धनादेश सुपूर्द

मोहोळ (क.वृ.):अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पाची टाकी कोसळून झालेल्या अपघाती घटनेमध्ये बिटले ता. मोहोळ येथील ज्योतीराम दादा वगरे, सुरेश अंकुश चव्हाण दोन कामगार बांधव मृत्युमुखी पडले तर इतर सहा जण जखमी झाले होते. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोन कामगार बांधवांच्या कुटुंबीयांची सहवेदना जाणून घेऊन सदर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा दिलासा म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा धनादेश या कुंटूबियांना कारखाना प्रशासनाच्यावतीने कारखान्याचे चेअरमन तथा जि प सदस्य बाळराजे पाटील यांच्या उपस्थीतीत सुपुर्द केला. यावेळी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, शहाजीराव पाटील उपस्थित होते.

लोकनेते कारखान्याच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत अहोरात्र झटणाऱ्या कामगार बांधवांचे श्रमीक योगदान निश्‍चितपणे मोठे आहे. लोकनेते कारखान्याच्या स्थापनेपासूनच संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी सुरुवातीपासूनच घेतली आहे. यापुढील काळातही कारखाना कामगार बांधवांच्या सुरक्षिततेसाठी सदैव दक्ष आहे.लोकनेते कारखान्याच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या मृत्युमुखी पडलेल्या दोन मृत्युमुखी आणि जखमी झालेल्या सहा कामगार बांधवांच्या कुटुंबीयांवर या अपघातामुळे कोसळलेल्या दुःखात संपूर्ण पाटील परिवार आणि लोकनेते कारखाना प्रशासन सदैव सहभागी असल्याची भावनिक ग्वाही यावेळी बाळराजे पाटील यांनी दिली.

यावेळी चेअरमन बाळराजे पाटील यांच्यासमवेत कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, शहाजीराव पाटील तसेच वगरे आणि चव्हाण कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments