आम शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फंडातून 40 हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी

सांगोला (कटूसत्य वृत्त):- आ. शहाजीबापू पाटील यांच्या फंडातून सुमारे 70 लाख 58 हजार रुपये खर्चून सांगोला शहरातील विविध 12 ठिकाणी व तालुक्यातील 28 गावे वाड्या वस्त्यांसह ,धार्मिकस्थळे आदि परिसरात सुमारे 40 हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी मिळाली असून परिसर प्रकाशमय केला जाणार आहे दरम्यान श्री दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर वझरे गावात हाय मास्ट दिवा बसून परिसर प्रकाशमय केल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे विधानसभा सदस्य आ. शहाजीबापू पाटील यांच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षातील फंडातून यापूर्वीच सुमारे 50 लाख रुपये निधीतून तालुक्यातील व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील प्रा. आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना पीपीई कीट मास्क, सॅनिटायझर आदि साहित्याचे वाटप केले असून अनेक रस्त्याच्या कामांसाठी निधी खर्च केला आहे आता त्यांच्या फंडातून व जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या नियोजनातून सांगोला तालुक्यातील 28 गावे , वाड्या-वस्त्यांसह धार्मिक स्थळे, चौक आदी ठिकाणी तसेच सांगोला शहरातील 12 विविध ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. ठेकेदाराकडून सदर ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचे काम सुरू झाले असून वझरे गावात हायमास्ट दिवा बसवून कार्यान्वित केला आहे. लवकरच उर्वरित मंजुरीच्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसवून रात्रीचा अंधार दूर केला जाणार असल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
0 Comments