Hot Posts

6/recent/ticker-posts

हटकर मंगेवाडीत शेकापला धक्का ; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

हटकर मंगेवाडीत शेकापला धक्का ; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

          सांगोला (कटूसत्य वृत्त):- डिकसळ भोपसेवाडी तरंगेवाडी नंतर आता हटकर मंगेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनीही शेतकरी कामगार पक्षाला रामराम करीत सोमवार दि  28 रोजी जवळा येथे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सर्व नूतन नेतेमंडळी व कार्यकर्त्यांचा सत्कार करून पक्षात स्वागत केले.

          ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच, तालुक्यातील प्रस्थापित शेतकरी कामगार पक्षाला दिवसेंदिवस जबरदस्त धक्के बसत आहेत. डिकसळ भोपसेवाडी तरंगेवाडी नंतर आता हटकर मंगेवाडी येथेही शेकापला धक्का देत महादेव शत्रुघ्न सुतार, महावीर सावळा कांबळे, भारत आबा होवाळ, कैलास धोंडीबा जाधव, अमोल विठ्ठल जाधव, इब्राहिम मोहन शेख, अण्णासो बाजी होवाळ, राजू धोंडीबा भुसनर, अण्णासो तानाजी कर्वे, पांडुरंग सुखदेव साबळे, दिनकर ज्ञानू खांडेकर आधी प्रमुख नेते मंडळींनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सुनील खांडेकर सुरेश होवाळ दादासो खांडेकर आदींसह हटकर मंगेवाडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

          ग्रामपंचायत निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत अशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाला एकापाठोपाठ एक जबर धक्के देत अनेक गावातून असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. दिवसेंदिवस शेकापमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे सत्र सुरू असल्याने शेतकरी कामगार पक्षाची डोकेदुखी चांगलीच वाढू लागली आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस आपली संघटना व राजकीय ताकद बळकट करू लागला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.

दिपकआबा म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व
गेल्या तीस वर्षांपासून सत्ता किंवा राजकीय पद असो किंवा नसो दिपकआबा पाटील यांनी सदैव सामान्य नागरिक केंद्रभूत मानून कधीच पक्ष पार्टी जात-पात यांना थारा न देता सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक प्रयत्न केलेत. यापुढील काळात दिपकआबांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची सांगोला तालुक्याला गरज आहे. - महादेव सुतार (जेष्ठ नेते,ह.मंगेवाडी)

Reactions

Post a Comment

0 Comments