Hot Posts

6/recent/ticker-posts

तलवार घेऊन फोटो काढणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल

तलवार घेऊन फोटो काढणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल 

          अकलूज (कटूसत्य वृत्त):- तलवार, कुराङ व लाकङी दांङके हातात घेऊन फोटो काढणे व हे फोटो सोशल मिङीयावर टाकणे काही तरुणांना भलतेच महागात पङले असून  ७ तरुणांना पकङुन अकलूज पोलीसांनी न्यायालयात उभे केले.

          याबाबत अकलूज पोलीसांकङुन मिळालेली माहीती अशी की, पिसेवाङी, ता. माळशिरस येथिल दीपक शिवाजी भाकरे, शहाजी जनार्धन इंगळे, शैलेश शहाजी भाकरे, महेश नवनाथ भाकरे, सागर अच्युतराव चव्हाण, सतिश सदाशिव इंगळे व समाधान निवृत्ती भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार, कुराङ व लाकङी दांङके घेऊन फोटो काढले व ते सोशल मिङीयावर अपलोङ केले. हे फोटो सोशल मिङीयावर आल्याने जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोठेतरी टोळीयुध्द होणार कि, हे तरुण काहीतरी मोठी गङबङ करणार अशी  शंका निर्माण झाली. या तरुणांनी पुढील हालचाल करण्यापुर्वीच कर्तव्यदक्ष अकलूज पोलीसांनी ताबङतोब यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.या सर्व तरुणांवर आर्म अॕक्ट कलम ४/२५ व मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना माळशिरस न्यायालयात हजर करण्यात आले.

          सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय पुजारी, पोलीस अंमलदार बाळासाहेब पानसरे, संतोष घोगरे, सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी, विश्वास शिनगारे, मंगेश पवार, नितीन लोखंङे, निलेश काशिद, विक्रम घाङगे व मनोज शिंदे यांनी केली आहे. या गुन्हेगारांनी शस्ञे कोठुन आणली, निवङणुक काळात कोण शस्ञ पुरवठा करत आहे, यांचा हेतु काय होता याचा पुढील तपास पोहेकाॕ. क्षीरसागर हे करत आहेत

अकलूज पोलीस स्टेशन सीआर नंबर ५४८/ २०२० भा द वि १४३,१८८  आर्म एक्ट ०४:२५ मुंबई पोलीस कायदा १३५ गुन्हा दाखल झाला आहे.

          सध्या माळशिरस तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवङणुकांची तयारी सुरु आहे. अशा काळात गुंङ प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अकलूज पोलीसांची करङी नजर आहे. चौकामध्ये तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे, शस्ञे हातात घेऊन नागरीकांना धमकावणे, शस्ञे घेऊन फिरणे, राञी उशिरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पार्टी करणे अशी कृत्ये करुन सामाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्यावर तङीपारची कारवाई करण्यात येईल. - भगवानराव निंबाळकर (पोलीस निरीक्षक, अकलूज)

Reactions

Post a Comment

0 Comments