नगर परिषदेच्या प्रतीक्षेत अकलुज ग्रामपंचायत?

अकलूज (विलास गायकवाड):- आशिया खंडातील अत्यंत प्रबळ आणि प्रभावी असणारी अकलूज ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या प्रतीक्षेत असून सर्वांचीच उत्सुकता वाढली असल्याचे चित्र दिसत आहे.
अकलूज ग्रामपंचायतीची स्थापना १९२२ साली झाली असून, ग्रामपंचायतीच्या सभागृहातून अकलूज गावचा कायापालट झाला आहे. सध्या नगर परिषदेचे महत्त्व नागरिकांना समजत चालले असून, नगरपरिषद काय देऊ शकते? आणि नगर परिषदमुळे काय होऊ शकते; हा चर्चेचा विषय बनला आहे. परंतु आजपर्यंत अकलूज ग्रामपंचायतीने काय दिले आणि काय केले याचा विसर मात्र सर्वांनाच होऊ लागला आहे. आशिया खंडात अकलूज ग्रामपंचायत कर्तुत्वाच्या शिखरावर विराजमान असून कर्तबगारीचा ठसा ही तेवढाच दमदार उमटवला आहे. अकलूजच्या महाकाय विकासाचे प्रश्न ग्रामपंचायतीच्या सभागृहातून मार्गी लागले आहेत,सोडवले गेले आहेत. राज्याच्या विकासात भरीचे साम्राज्य निर्माण करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला अकलूज ग्रामपंचायत पासून सुरुवात झाली होती! तर याच ग्रामपंचायतीच्या सभागृहातून अनेक नेते मंडळी राजकीय क्षितिजावर झळकू लागले हे अविस्मरणीय आहे. अकलूजच्या भुईकोट किल्ल्याचे रुपांतर शिवसृष्टी झाले, गावाच्या वैभवात भर पडणारा जलतरण तलाव हे चैतन्याचे ठिकाण ठरले, साडेतीन शक्तीपीठ नंतर आवर्जून अकलाई मातेच्या मंदिरात जावे असे तिर्थ क्षेत्र तयार झाले. विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल मैदानातून ऑलम्पिक वीर घडावा असा परिसर निर्माण झाला, विविध शासकीय कार्यालये, दुभाजक रस्ते, अंतर्गत रस्ते, महापुरुषांचे पुतळे, व्यवसायिक गाळे त्यातून हजारो बेरोजगारांना मिळालेला रोजगार, टपरी आणि झोपडीमुक्त परिसर, जीपीएस प्रणाली विकसित, सीसीटीव्ही कॅमेरे हेही अविस्मरणीय आहे. असे कित्येक विषय आहेत.
सध्या माळशिरस तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे राजकीय रणांगण तापन्याच्या तयारीत असले तरी, अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतरही नगर परिषदेच्या दिशेने अंतिम टप्प्यात आले आहे. निवडणूक होईल का? नाही.. हा प्रश्न सर्वांनाच पडला असला तरी, न.. ग.. र.. परिषद म्हणारांची चांगलीच पंचायत झाली आहे. तर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा नगर परिषदेची निवडणूक झाली तर सोयीस्कर होऊन वेळ, पैसा, आणि श्रम वाचेल! असे राजकीय जाणकारांचं मत असून अकलूज ग्रामपंचायत मात्र नगरपरिषदेच्या प्रतीक्षेत उभी आहे?
0 Comments