राजस्तरीय रोजगार मेळाव्याचे 12,13 डिसेंबर रोजी आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 4, 2020

राजस्तरीय रोजगार मेळाव्याचे 12,13 डिसेंबर रोजी आयोजन

राजस्तरीय रोजगार मेळाव्याचे 12,13 डिसेंबर रोजी आयोजन 

सोलापूर, (क.वृ.): कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत दिनांक 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी  राज्यस्तरीय महारोजगा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसापासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद आहेत. त्यामुळे बरेचसे परप्रांतीय कामगार/मजूर त्यांच्या गावी निघून गेलेले आहेत. शासनाने  काही अटी व शर्तीच्या अधिन राहुन उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. लॉकडाऊन नंतर नव्याने व्यवसाय /उद्योग सुरु करताना जिल्हयातील आस्थापनामध्ये मोठया प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात राज्यातील नामवंत उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली 50,000 पेक्षा पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा. त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्य मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे घेण्यात येणार आहेत.

ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उ्रॉईंग हॉल ईमारत,महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला,( नॉर्थ कोट) पार्क चौक, सोलापुर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या अधिक माहितीसाठी 0217-272216 दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages