मास्क वापरा, हात धुवा, गर्दी टाळा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 4, 2020

मास्क वापरा, हात धुवा, गर्दी टाळा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

मास्क वापरा, हात धुवा, गर्दी टाळा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन


सोलापूर, (क.वृ.): कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्यापही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे याबाबी कटाक्षाने पाळायला हव्यात असे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. 

टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथे श्री. पटोले आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव शिंदे, संत कूर्मदास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिरीष पाटील, संदीप साठे, राजकुमार पाटील, संजय पाटील, वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पाटील, अँड. अर्जुन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे आदी उपस्थित होते. 

श्री. पटोले म्हणाले, कोरोनाची महामारी असल्याने प्रत्येकाने वैयक्तिक आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. अजून कोरोना संपायचा आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अतिवृष्टी झाली. याचाही फटका शेतकऱ्यांना बसला. सोलापूर जिल्ह्यात तर कहर झाला. मात्र राज्य शासनाने महिन्याभरात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. पडझड झालेल्या घराबाबत भरीव मदत केली आहे. 

श्री. पटोले यांनी कांदा निर्यात बंदी,  एफआरपी,  वीज बिल याबाबतही आपले मत व्यक्त केले. यावेळी विविध मागण्यांची निवेदने नागरिकांनी श्री. पटोले यांना दिली. तत्पूर्वी टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटलमध्ये हाडाचे ऑपरेशन करण्याच्या सीआर मशिनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages