Hot Posts

6/recent/ticker-posts

महापरिनिर्वाण दिनी लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे - धनंजय मुंडे

 महापरिनिर्वाण दिनी लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे - धनंजय मुंडे

चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

मुंबई(क.वृ.): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाणदिनाच्या दिवशी अनुयायांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावेचैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे असे आवाहन  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे राज्यातील प्रमुख वाहिन्यांसोबतच शासकीय वाहिन्या तसेच विविध समाजमाध्यमांतून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. देशातील प्रत्येक आंबेडकरी अनुयायांना आपल्या घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments