माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडून घोडके पाटील परिवाराचे सांत्वन

सांगोला (क.वृ.): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांनी दामोदर आण्णा घोडके पाटील यांच्या पाचेगाव बुद्रक येथील निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.केशव गुरुजी व माधव शेठ यांना धीर दिला. घोडके पाटील परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. साळुंखे पाटील परिवार त्यांच्या दु:खात सहभागी आहे. दामोदर आण्णा घोडके पाटील हे कार्यसम्राट माजी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यावर श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व होते. माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत दामोदर आण्णाची मार्गदर्शकाची भुमिका होती. पाचेगाव हा माझा परिवार आहे.
गावातील सर्वांच्या सुखदु:खात, विकास कामात, सामाजिक कार्यात दामोदर आण्णा, राम गुरुजी, हरि आण्णा,वसु गुरुजी, तुका गुरुजी हे काकासाहेबांचे जुने सहकारी गावकऱ्यांच्या सोबतीने कायम अग्रेसर असायचे. जुनी वडीलधारी माणसं आता सोडून गेल्याने गाव पोरका झाला आहे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कोळ्याचे सरपंच शहाजी हातेकर, माजी उपसरपंच आदिक नाना चव्हाण, कोळा गट युवक राष्ट्रवादी अध्यक्ष नाथबाबा चव्हाण उपस्थित होते.
0 Comments