युवकांचे प्रश्न पुढील काळात सोडवण्यात येतील - रोहित पवार

बार्शी (क.वृ.): सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यास प्राधान्य देऊ असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले,ते पुणे पदवीधर निवडणूकीच्या मतदानाच्या प्रचारार्थ बार्शी येथील नवले ग्लास हाऊसला येथे धावती भेट देताना उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.
या वेळी त्यांनी तुम्ही सर्वजण एकत्र या मी तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतो असे सांगितले,तसेच आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवारांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले,या वेळी युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सोलापूर अध्यक्ष प्रदीप नवले, मंगेश पवार, अजय पाटील, रोहित डीसले, अभिलाष धारणे,शुभम तकिक, गोकुळ यादव, अमोल मिरगणे, लक्ष्मण शिंदे, सागर सातपुते, वैभव राऊत,उमेश चव्हाण, गणेश माने,निलेश मांजरे,सूरज वसे,अंकुश थोरात, इ. पदवीधर मतदार प्रचंड संख्येने उपस्थित होते.
0 Comments