Hot Posts

6/recent/ticker-posts

इंजि मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ संभाजी ब्रिगेडची आघाडी - शंकर पोळ

 इंजि मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ संभाजी ब्रिगेडची आघाडी - शंकर पोळ

करमाळा (क.वृ.): संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर विधानपरिषद मतदार संघातील अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात संभाजी ब्रिगेडने जोरदार मुसंडी मारली असून जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श प्रचारयंत्रणा राबविण्यात येत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ यांनी दिली.

यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,माजी तालुकाध्यक्ष प्रा नागेश माने , सचिव सचिन शिंदे,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे, जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, सचिव गणेश डोके आदी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना शंकर पोळ म्हणाले की, इंजिनिअर मनोज गायकवाड यांच्या सोबत मराठा सेवा संघाच्या 33 शाखा खंबीरपणे उभ्या असून तालुक्यातील डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद  तसेच सर्व कक्षांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारात झोकून देऊन प्रचार करत आहेत.मनोज गायकवाड यांना संपूर्ण मतदारसंघात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून मनोजकुमार गायकवाड यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

मनोजकुमार गायकवाड यांनी मागील काळात पदवीधर ऑनलाईन नोंदणी, विना अनुदानित शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला असून पदवीधर, शिक्षक तसेच मतदार हे योगदान कदापिही विसरणार नाहीत.याची पावती मतपेटीतून नक्कीच मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments