विद्यार्थ्यांच्या अडचणीला धावून येणारी संघटना म्हणजेच भारतीय विध्यार्थी सेना- हर्षल देशमुख
मोहोळ (क.वृ):- सोलापूर येथे विद्यार्थी सेना सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी सोलापूर ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी हर्षल देशमुख यांची निवड झाली. मोहोळ तालुक्यातील विध्यार्थी मित्रांच्या मदतीला धावून,त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारी संघटना,सामाजिक कार्यांत अग्रेसर असणारी विद्यार्थ्यांची मजबूत संघटना व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जोपासणारी ज्वलंत शिवसेना प्रणित संघटना आहे. शिवसेना विध्यार्थी सेने मार्फत 80 % समाजकारण व 20 % राजकारण असा विचार जोपासत असताना वयाच्या 15 व्या वर्षी सामाजिक कार्य चालू करत पक्ष श्रेष्टीने दखल घेत वयाच्या 18 व्या वर्षी विध्यार्थी सेना तालुका प्रमूख पदी वर्णी लागली. ह्या जगातील असा एकमेव पक्ष आसेल जो सामान्य कुटुंबातील युवकाला नेतृत्व करण्याची संधी देतो. व विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवत ,शैक्षणीक क्षेत्रात दबदबा वाढवत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावत वयाच्या 22 व्या वर्षी विध्यार्थी सेना जिल्हाप्रमुख पदी निवडीचे पत्र मा. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब, जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर साहेब, शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर विध्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहुजी जिल्हा गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी देशमुख म्हणले , माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील व कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षातील नेते मंडळींनी माझ्या वर जी जबाबदारी दिली , हीच दिशा घेऊन सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावून , शिवसेना पक्ष वाढीकरिता जेवढं कष्ट घ्यावे लागेल तेवढं घेऊन सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी सेना जोमाने कामाला लागेल आसे आश्वासन यावेळी पक्षश्रेष्ठींना दिले. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब, जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर, शहरप्रमुख गुरुशंत धुत्तर्गावकर, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहुजी गायकवाड, जिल्हा सचिव रोहित अक्कलकोट, सोलापूर शहर प्रमुख तुषार आवताडे, विजय दादा गायकवाड , उपजिल्हाप्रमुख प्रशांत होनमाणे, उपजिल्हाप्रमुख सुरज जम्मा, उपतालुकाप्रमुख दादा बेलदर , प्रवीण गायकवाड, किरण गायकवाड, समाधान वाघमोडे ,योगेश माळी, सुदन गायकवाड, विजय महाडिक, प्रशांत जाधव, संदीप महाळनूर तसेच विध्यार्थी सेना मोहोळ तालुक्यातील पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.
माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील व कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षातील नेते मंडळींनी माझ्या वर जी जबाबदारी दिली , हीच दिशा घेऊन सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावून , शिवसेना पक्ष वाढीकरिता जेवढं कष्ट घ्यावे लागेल तेवढं घेऊन सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी सेना जोमाने कामाला लागेल आसे आश्वासन यावेळी पक्षश्रेष्ठींना दिले.
हर्षल ब्रह्मदेव देशमुख - जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा(ग्रामीण)
0 Comments