साखर पुडा करीता गेले आणि लग्न कार्य केले मोहोळ येथील खवळे कुठुंबियांचा आगळा - वेगळा संदेश
मोहोळ (क.वृ):- सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून मुलगी पाहण्यात पाहुणे मंडळींनी ये-जा सुरू असते. वर पक्षाकडून वधू पक्षाकडे अपेक्षा अधिक असल्याने कित्येक दिवस मुली पाहण्यात जातात. त्यानंतर पसंद कळविण्यानंतर साखरपुडा, लग्न आदीच्या नियोजनात दिवसें - दिवस जात असतात.
परंतु मोहोळ येथील खवळे परिवारांनी साखर पुडा करीता पुणे येथे गेले असताना कोणतीही अपेक्षा न करता त्वरित विवाह करून समाजाला आगळावेगळा संदेश दिला आहे.
पुणे जिल्हांतील येथील हडपसर येथे राहणारे विठ्ठल शिवाजी वाघमारे यांची सुकन्या नेहा यांच्याशी मोहोळ येथील नागनाथ खवळे यांचा ८ नोव्हेंबर रोजी रविवारी सायंकाळी योजले होते.
भव्य - दिव्य साखर पुडाची तयारी पाहता वधू व वर मंडळाने कशाचीही अपेक्षा न करता कमी वेळेत सर्व तयारी करुन साखरपुडा, हळद ते लग्न करण्याचा प्रस्ताव वर पक्षांनी वधू मंडळी समोर ठेवला आसता त्यांनी ही लग्नाचा निर्णय मान्य केला व वधू आणि वर मंडळीने प्रस्तावांस मान्यता दिली.
यावर नवरदेवाचे मोठे भाऊ महादेव खवळे, मोहोळ नगर परिषदेचे नगरसेवक दत्तात्रय खवळे व नवर देवाचा मामा राजन घाडगे आणि नवरी मुलीचे वडील विठ्ठल वाघमारे व आई लक्ष्मी वाघमारे यांनी चर्चा करून काही हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार साखरपुडा, हळद ते लग्न विवाह कमी वेळेत चांगल्या पद्धतीने अटोपण्यात आला. यावेळी सर्वांनी त्या निर्णयाचे स्वागत करत भटजी यांनी झालेला विवाह हा हिंदू धर्मशास्त्रानूसार झालेला विवाह आदर्शवत असल्यांचे सांगितले. नागनाथ आणि नेहा यांचे लग्न समारंभ पार पडले.
महादेव खवळे, सोपान खवळे, संजय खवळे, अनिल खवळे, उमेश कांबळे, महादेव क्षीरसागर, दिनेश कांबळे, विमल खवळे, रेश्मा खवळे, मंदाकिनी खवळे, अंबिका कांबळे, हनुमंत कांबळे, भारती खवळे, क्षीरसागर, ज्योती ठोंबरे -घाडगे, छाया घाडगे, रेखा क्षीरसागर वर पक्षांकडील मंडळी उपस्थित होते तर विठ्ठल वाघमारे, हनुमंत खंडाळे, चेतन घोलप, अभिजित वाघमारे, लक्ष्मी वाघमारे, रुपाली खंडाळे, इंदूमती वाघमारे, चंदू घोलप, विमल अडगळे , नमन साबळे, सखुबाई घोलप, नंदाबाई घोलप , काजल घोलप, पुनम कांबळे, ललिता कांबळे, वनिता पारखे आदि. वधू कडील मंडळी उपस्थित होते.
हुंडा आणि लग्नामध्ये विविध वस्तूंची मागणी करत वेगवेगळ्या प्रकारे मोठा खर्च करून लग्न समारंभ पार पाडून कर्जाचा डोंगर उभा करतात मात्र खवळे कुठुंबियांनी साखर पडामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देत ताबडतोब विवाह करून समाजाला आदर्श घालून दिला आहे खवळे आणि वाघमारे दोन्ही परिवारांचे विधी स्वयंसेवक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा जिल्हा शांतता कमिटी सदस्य राजन घाडगे यांनी आभार मानले. श्री.नागनाथ व सौ.नेहा यांना सोशल मीडिया मधून लग्नाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
0 Comments