स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते
भूगोल विषयाच्या पुस्तकाचे प्रकाशन
या पुस्तकाचे प्रकाशन मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले .या पुस्तकात अभ्यासक्रमास अनुसरून, भूरूपशास्त्र व्याख्या स्वरूप व व्याप्ती , पृथ्वीच्या हालचाली , भूरूपीय प्रकिया, व भूरूपांची उत्क्रांती, या चार प्रकरणांची मांडणी सोप्या भाषेत करण्यात आली असून त्यास अनुसरून आकृत्यांचे रेखांकन करण्यात आले आहे. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, कार्यालयीन अधीक्षक श्री. युवराज मालुसरे, डॉ.सज्जन पवार, प्रा.नाना वरकड इ. उपस्थित होते.
0 Comments