पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आ. रोहित पवार यांचे आवाहन

मोहोळ (क.वृ.): पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रचार सभा मोहोळ येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेचे प्रमुख मान्यवर कर्जत जमखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड हे चारित्र्यसंपन्न व सामाजिक प्रश्नाची जाण, पदवीधर युवकांचे प्रश्न सोडवतील यात मात्र शंकाच नाही. तर जयंत आसेगांव यांचे व्यक्तीमत्व अभ्यासु अशा या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना पसंती क्रंमाक एकचे मत देऊन विजयी करा. असे विचार व्यक्त केले.
विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसेगांवकर यांच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानिमीत्त मोहोळ नागरी पतसंस्थेच्या प्रांगणात आमदार रोहीत पवार यांची सभा संपन्न झाली .त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार यशवंत माने होते. या प्रसंगी यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी तालुक्यातील तीन हजारापेक्षा जास्त पदवीधर मतदारापैकी दोन हजाराच्या पुढे मतदान मिळवुन देऊ असे सांगितलेतर आता मी साठीच्या पुढे गेलो असून आम्ही रिटायर्ड असे ते म्हणाले त्यावर रोहित पवार म्हणाले की हा तालुका हा शरद पवारांच्या विचारावर चालणारा आहे त्यामुळे शरद पवारांचे सध्या वय काय आहे ते सध्या तरुण मुलासारखे काम करतात मग तुम्ही देखील युवका सारखे काम करायला काय हरकत आहे तुम्ही देखील रिटायर होण्याची भाषा करू नका . यावेळी लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ यशवंत माने , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख , स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पप्पु पाटील यांनीही मनोगत व्ययक्त केले या प्रसंगी अजिंक्यराणा पाटील, जि.प.सदस्य शरद अरूण लाड, प्रकाश चवरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अशोक भोसले , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, मोहोळ नागरीचे चेअरमन कौशीक गायकवाड , पक्षनिरीक्षक निरंजन भूमकर, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, सुभाष गुळवे, जि.प.सदस्य शहाजान शेख, ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर,, सभापती रत्नमला पोतदार, माजी उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके माजी उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, माजी नगरसेवक मुश्ताक शेख, संतोष सुरवसे , संतोष वायचळ, यशोदा कांबळे, मार्केट कमेटीचे सभापती असलम चौधरी, नागेश साठे, दिपक माळी ,प्रशांत बचुटे, सुदर्शन कादे, माजी नगरसेवक कुंदन धोत्रे, राहुल मोरे, हेमंत गरड, जालिंधर लांडे , दत्ता पवार, राजाभाऊ गुंड, पंडीत ढवण ,मकू हावळे, विजय कोकाटे, सचिन चवरे, धनाजी गावडे, यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर प्रमुख पदाधिकारी व पदवीधर शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जि प.सदस्य विक्रांत पाटील यांनी तर सुत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी केले.
या प्रचार सभेदम्यान पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार पंचावन्न क्रंमाकांचे उमेदवार सिताराम रणदिवे यांनी माघार घेत महाविकास आघाडीच्या लाड यांना पाठींबा दिला. या बद्धल आ.रोहीत पवारांच्या हस्ते रणदिवेंचा सत्कार करण्यात आला.
0 Comments