शंकरराव मोहिते महाविद्यालयात संविधान दिन साजरा

अकलूज (क.वृ): येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात सांस्कृतीक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन व २६/११ रोजीच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना महाविद्यालयाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेतील मसुद्याला अनुसरून आपले विचार व्यक्त केले व त्यानुसार भारतातील लोकशाही पद्धत असणार्या देशात राज्यघटनेनुसार विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे सांगितले. घटना मसुदा लिहीत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक दुर्बल व सामाजिक घटकांना अनुसरून केलेली मांडणी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले, कारण भारतामध्ये अनेक जाती धर्माचे, पंथाचे लोक राहत असून प्रत्येक धर्मांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार अभिव्यक्त करण्याची संधी व सर्वांना समान न्याय देण्याची क्षमता या घटना समितीच्या मसुद्यात असलेली पहावयास मिळते. त्यामुळे हे सर्व धर्मीय लोक एका माळेमध्ये देश स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष एकत्र राहत आहेत .
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की या, भारतीय संविधानाचा सर्वांनी मान राखला पाहिजे. तसेच भारतातील प्रत्येक नागरिकांना आपल्या अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे यासाठी सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले व उपस्थित सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले. यावेळी , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री युवराज मालुसरे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments