दत्तात्रय सावंत यांच्या 'होम टू होम' प्रचाराचा जोरदार शुभारंभ

सोलापूर (क.वृ.):- पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार दत्तात्रय सावंत सर यांच्या 'होम टू होम' प्रचाराचा जोरदार शुभारंभ दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी उमेदवार दत्तात्रय सावंत सर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, संपर्क प्रमुख शंकर वडणे, राज्य संघटक समाधान घाडगे, राजेंद्र आसबे, श्रीधर उन्हाळे, राजेन्द्र माळी, शाहूराजे पाटील,राजेश पवार, आण्णा मोरे, मुकुंद मोहिते, धन्यकुमार मोरे, सारंग पाटील, उदयसिंह धावणे पाटील, संतोष गायकवाड,आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments