रोटरी क्लब, मेडिकल असोसिएशन व इनरव्हील क्लबच्या मधुमेह शिबिरात 270 नागरिकांची तपासणी

सांगोला (क.वृ.):- रोटरी क्लब सांगोला, मेडिकल असोसिएशन सांगोला आणि इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर "मधुमेह दिनानिमित्त" सांगोला तालुका व परिसरातील नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.
नगरपालिका कार्यालय ,तहसील कार्यालय, सांगोला बसस्थानक, महात्मा फुले चौक, वंदे मातरम चौक या ठिकाणी ही मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच मधुमेह या आजाराची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात जनजागृतीसाठी माहितीपत्रके वाटण्यात आली. सदर शिबिराचा 270 शिबिरार्थींनी लाभ घेतला या शिबिराकरिता केदार रिसर्च सेंटर, यावलकर पॅथॉलॉजी, डॉ.प्रमोद बोराडे पॅथॉलॉजी व संजीवनी पॅथॉलॉजी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाकरिता रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.महेश गवळी, सचिव रो.प्रवीण मोहिते, प्रोजेक्ट डायरेक्टर रो. गोविंद माळी, डॉ.प्रमोद बोराडे, रो. डॉ.प्रभाकर माळी, रो. डॉ. मच्छिंद्र सोनलकर, रो. डॉ. कोळेकर, रो. इंजि.विकास देशपांडे, रो. निलकंठ लिंगे सर, पत्रकार राजेंद्र यादव, रो. निसार इनामदार, रो. दीपक चोथे, डॉ. रो. रणजीत केळकर,रो. इंजि. मधुकर कांबळे, रो. धनाजी शिर्के, रो. अमर जाधव, रो. विजय म्हेत्रे, इनरव्हील क्लब अध्यक्ष शुभांगी पाटील, सदस्य संगीता चौगुले आदी सदस्य उपस्थित होते.
0 Comments