Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत 214 किलो गांजा जप्त

टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत 214 किलो गांजा जप्त

कोडा कार सह 36 लाख 41 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

टेंभुर्णी (क.वृ.): टेंभुर्णी पोलीस व मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैधरित्या विक्रीसाठी गांजा घेऊन जाणारी स्कोडा कार पकडली असून मात्र कार चालक पळून गेला. या कारमधून २१ लाख ४१ हजार २२० रूपये किंमतीचा २१४ कि.१२२ ग्रॅम गांजा व अंदाजे १५ लाख रुपये किंमतीची स्कोडा कार असा एकूण ३६ लाख ४१ हजार २२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६ वा. सुमारास महामार्गावरील वरवडे टोल नाका येथे केली असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द एनडीपीएस. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत टेंभुर्णी पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कार (एमएच- ०६ -एडब्ल्यू ५९२२) या गाडीतून अवैध विक्रीसाठी गांजा घेऊन कार जात आहे.ही माहिती करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ विशाल हिरे यांना देण्यात आली असता त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

या अनुषंगाने पोनि राजकुमार केंद्रे,सपोफौ अशोक बाबर,पोहेकॉ अभिमान गुटाळ,सपोफौ शिवाजी भोसले,पोहेकॉ अजित उबाळे, पोना धनाजी शेळके,पोना बालाजी घोळवे, विशाल शिंदे,पोकॉ आलीम शेख,गोविंद बचुटे,पोना हरीश भोसले, पोना केशव सुर्वे, आसिफ आतार, रामेश्वर पवार व  चालक राजेंद्र ख॔डागळे हे कारवाई करण्यासाठी रवाना झाले.

तसेच मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पडवळ यांनाही सहकाऱ्यासह वरवडे टोलनाक्यावर येण्यास सांगितले.त्यामुळे पोसई रामेश्वर पडवळ, पो.ना.केशव सुर्वे,पोहेकॉ अमोल भोरे, पो.काॅ.रामेश्वर पवार,पोकॉ गणेश शिंदे या सहकाऱ्यासह सर्वजण वरवडे टोलनाक्याच्या पुढे येऊन थांबले.थोड्या वेळात पांढऱ्या रंगाची स्कोडा कार येताना दिसली.त्यावेळी समोर पोलीस असल्याचे दिसताच कारवाईच्या भीतीने कारचालकाने कारचा दरवाजा उघडून पाठीमागील बाजूने पळ काढला.

पोलीसांनी कारची तपासणी केली असता डिकीत गांजाचे अंदाजे दोन किलो वजनाचे १०७ खाकी रंगाचे चिकटपट्टी लावलेले पुडे आढळून आले.कारमधील गांजाचे वजन केले असता २१४ किलो १२२ ग्रॅम भरले असून त्याची किंमत २१ लाख ४१ हजार २२० रूपये एवढी होत आहे.यामध्ये गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली अंदाजे १५ लाख रुपये किंमतीची स्कोडा कार गांजासह पोलीसांनी जप्त केली. याप्रकरणी पोहेकॉ शिवाजी भोसले यांनी फिर्याद दिली असून तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे अधिक तपास करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments