पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांची ताकद वाढली पाहिजे - रुपालीताई चाकणकर

सांगोला दि.११(क.वृ.): पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांना समान हक्क आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी व स्त्रियांवरील अत्याचार थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची जिल्हा ते गाव पातळीपर्यंत बुथ कमिटी नियुक्त केली जात आहे. नूतन महिला पदाधिकाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारावी असे सांगत माजी आमदार दिपकआबा व जयमाला ताईंच्या मार्गदर्शना खाली तालुक्यात महिला राष्ट्रवादीची फळी मजबूत असल्याचे मत प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सांगोला येथे व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी काल शनिवार दि.10 रोजी सांगोला तालुक्याला भेट दिली असता त्या बोलत होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सांगोला शहर व तालुका महिला निवड संपन्न झालेल्या निवडीत दरम्यान राष्ट्रवादी भवन येथे महिला पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर बोलत होत्या यादरम्यान सांगोला शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदी शुभांगी पाटील, महिला राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्षपदी सूचित मस्के व अन्य पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र रुपालिताई यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा आमदार दीपकआबा साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष,जयमालाताई गायकवाड, जिल्हा अध्यक्ष अनिता नागणे,जिल्हा निरीक्षक दीपालीताई पांढरे, सचिव सुवर्णा बागल, तालुका अध्यक्षा सखूताई वाघमारे, डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील, उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव, माजी उपसभापती शोभाताई खटकाळे, नगरसेविका स्वाती म्हस्के, सुनिता खडतरे, पूजा पाटील, अनुराधा खडतरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्षा वाघमारे यांच्यासह तानाजीकाका पाटील, गटनेते सचिन लोखंडे, अनिल खडतरे, युवक तालुकाध्यक्ष अनिल नाना खटकाळे, शहराध्यक्ष प्रताप मस्के, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे,के.एस. साळुंखे अँड.संपतराव पाटील दिलीप मस्के आदी उपस्थित होते.
रुपालिताई चाकणकर पुढे बोलताना महिला तालुका अध्यक्षा सखूताई वाघमारे यांच्या कामाचे कौतुक करीत महिला पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. महिलांना उधोग, बचतगट व्यवसाय याचे प्रशिक्षण देणे,भांडवलाची उपलब्धता यावर संघटनात्मक प्रयत्न करावे असा सल्ला दिला. तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी या कर्तव्यदक्ष राहिल्या पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बुत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी लवकरच बूथ मेळाव्याचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चौकशी करणारा ऐंशी वर्षाचा तरुण योद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व करीत आहे. महिला सक्षम करण्यासाठी साहेबांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले आहेत.त्यामुळे भविष्यात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावेत. घरात बसून चूल आणि मूल म्हणणाऱ्या महिलांना जयमालाताई गायकवाड यांनी चांगली ताकद दिली आहे.यापुढेही महिला सक्षमीकरण करून पक्षाची ताकद वाढवत पवार साहेबांचे हात बळकट करावेत साहेबांनी महिलांसाठी केलेले कार्य व योगदान मोलाचे आहे.त्यामुळे गावपातळी पर्यंत राष्ट्रवादी पकधाचे कार्य कसे पोहचेल यासाठी सर्व महिलांनी प्रयत्न करावेत असे शेवटी रुपालीताई चाकणकर यांनी आव्हान केले.
0 Comments