Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षी साखर कारखान्याचा ५९ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न

सहकार महर्षी साखर कारखान्याचा ५९ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न

अकलूज दि.११(क.वृ.): सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा सण २०२०- २०२१ चा ५९ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ रविवार दिनांक ११.१०.२०२० रोजी सकाळी १०.३५ वाजता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

सकाळी ८.२० वाजता डिस्टिलरी व ऍसिटिक ऍसिड उत्पादन समारंभानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे चेअरमन संचालक नामदेव ठवरे व त्यांच्या सुविद्य पत्नी शांताबाई ठवरे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाले. सण २०१९ मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थिती मध्ये सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने कारखान्याचे माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पुरवठा आर. ओ. फिल्टर ३ कोटी २५ लाख लिटर पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. त्याची बाजारभावाप्रमाणे रुपये ५० कोटी इतकी किंमत होत आहे. तसेच या पूर्वीही कारखान्याचे सण १९७२ व २०१६ मध्ये पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.तसेच सध्या कोरोना रोगापासून संरक्षण होणे करता कारखान्याचे सभासद व कर्मचारी १५ हजार कुटुंबियांना आर्सेनिक अल्बम या होमोपथिक औषधाचा पुरवठा व १९१२ कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.सन २०१९ मध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात लक्षावधी कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झालेने मौजे चोपडेवाडी सांगली येथील ३५० कुटुंबीयांना कारखान्याचे माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला असल्याचे कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

कारखान्याचे चालू गळीत हंगाम २०२०-२०२१ मध्ये १४ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेल्या असून प्रति दिवशी ८ हजार मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रणा प्रणाली कार्यान्वित केली आहे. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले सर्व खातेप्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सदरचा कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करीत सामाजिक अंतर ठेवून संपन्न झाला.

Reactions

Post a Comment

0 Comments