आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गार्डी येथे रक्तदान शिबीर संपन्न

सांगोला दि.११(क.वृ.): कोरोना या महामारीमध्ये देशात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सांगोला विधानसभा मतदार संघाचे आ. शहाजीबापू पाटील यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने तालुक्यात रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काल शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी गार्डी येथे रक्तदान शिबीर पार पडले असून आज मेडशिंगी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत देश हा सध्या कोरोना सारख्या भयानक आजाराशी झुंज देत असून कोरोना बाधित रुग्णांसाठी मोठ्याप्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सदरचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेऊन सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. शहाजीबापू पाटील यांच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान सप्ताहामध्ये दि. ९ ऑक्टोबर रोजी ६५ रक्तदात्यांनी व काल शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी गार्डी येथे आयोजित रक्तदान शिबिरात १०9 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक पुणे नवनाथ अनपट, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पंढरपूर तालुका प्रमुख शांताराम यादव, पंढरपूर युवा सेना तालुका प्रमुख सोमनाथ अनपट, जयभवानी ग्रामविकास आघाडीप्रमुख राजेंद्र बागल, सरपंच शिवकुमार फाटे, तंटामुक्त अध्यक्ष अनिल हिंगमिरे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी जाधव, शिवाजी जाधव, मुकुंद अनपट, बबन मंडले, हेमंत गायकवाड, धनाजी जाधव, रियाज मुलानी, उमेश मोहिते, सचिन आसबे, राहुल अनपट आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष सहाय्य डॉक्टर मोहोळकर व डॉक्टर ज्योतीराम फाटे यांनी केले.
उद्या रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी मेडशिंगी या ठिकाणी तर सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी एखतपूर, मंगळवार दि. 13 ऑक्टोबर रोजी वाडेगाव येथे व बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी चिकमहुद याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबीर हे स. ९ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडले जाणार असून प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट किंवा पाण्याचा जार भेट म्हणून दिला जात आहे.
0 Comments