Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑनलाइन ऐवजी पारंपारिक पद्धतीने मोबाइल शॉपीद्वारे मोबाइलची विक्री व्हावी जिल्हा मोबाइल असोशिएशनची मागणी

ऑनलाइन ऐवजी पारंपारिक पद्धतीने मोबाइल शॉपीद्वारे मोबाइलची विक्री व्हावी जिल्हा मोबाइल असोशिएशनची मागणी 

बार्शी दि.११(क.वृ.): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच अडचणीत सापडलेला मोबाईल विक्रेता आता विविध मोबाईल विक्री करणार्‍या कंपन्यांच्या ऑनलाईन मोबाईल विक्रीमुळे आणखीच अडचणीत सापडला असून ऑनलाईन ऐवजी पूर्वी प्रमाणेच पारंपारिकपध्दतीने रिटेलर्सच्या माध्यमातून मोबाईल शॉपीव्दारे मोबाईल सेटची विक्री सुरू करावी अशी मागणी सोलापूर शहर व जिल्हा मोबाईल व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष घीरज कुंकूलोळ यांनी म्हटले आहे की, कोरना महामारीच्या काळात मोबाईल विक्रीचा जीएसटी कर 12 टक्क्यावरून खेट 18 टक्क्यापर्यंत वाढविण्यात आला आहे.  तसेच काही नामवंत ब्रॅण्डेड कंपन्या जाणुन बुजून मोबाईल रिटेल मार्केट उध्वस्त करण्याच्या मनस्थितीत आहेत. कोरोना संसर्गामुळे अगोदरच मोबाईल विक्री व्यवसायावर मंदीचे सावट आहे त्यात जीएसटी 6 टक्क्याने वाढल्याने मोबाईल सेटच्या किंमतीततही वाढ झाली आहे त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर झालेला आहे.  एकिकडे ब्रॅण्डेड कंपन्या मुद्दामहून रिटेल बाजारात पुरेसा मोबाईल विक्रीसाठीचा स्टॉक उपलब्ध करून देत नाहीत तसेच नवीन मॉडेल देखील रिसेटलर्सना न देता त्याची ऑनलाईन विक्री करताना दिसत आहेत. ऑनलाईन विक्रीचे महत्व वाढविण्यासाठी मोबाईल रिटेलर्सना  वाढीव रेटने स्टॉक देतात त्यामुळे पारंपारिक पध्दतीने शॉपी चालविणार्‍या विक्रेत्यांची मोठी अडचण होत असून व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

ग्राहकांना थेट ऑनलाईन पध्दतीने मोबाईल विक्रीत सवलत देणे, अवाजवी ऑफर्स देणे या प्रकारे रिसटेलर्सना अडचणीत आणण्याचा प्रकार होत आहे.  त्यामुळे ऑनलाईनपध्दतीने मोबाईलची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. त्यामुळे पारंपारिक पध्दतीने शासनाचे कर भरणार्‍या सचोटीने व्यापार करणार्‍या रिटेलर्सवर अन्याय होत आहे. अगोदरच बाजारपेठेत मंदीचे वातावरण असून आता ऑनलाईनचे पेव फुटल्याने मोबाईल रिसेटलर्सना दुकान बंद करण्याची वेळ आली आहे त्यामुळे दुकानावर अवलंबून असलेल्या कामगारांवरही उपासमारीची वेळ येईल अशी भीती देखील कुंकूलोळ यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा व शहर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने याचा निषेध करत लवकरच संघटनेच्या वतीने याच्या विरूध्द आवाज उठविण्यासाठी शहर व गाव पातळीवर मिशन  राईट फॉर फाईट हे आंदोलन सुरू केले असून त्याला प्रतिसादही मिळत आहे. लवकरच सोलापूर जिल्ह्यातही ही मिशन राबविणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्य मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश चिंचोळी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पालेवार, झोन अध्यक्ष गणेश महाडीक, झोन अध्यक्ष राजन कांबळे, झोन अध्यक्ष सोमनाथ खरे, सचिव शशिकांत सादिगले, सहसचिव हर्षवर्धन दोशी, खजिनदार प्रफुल्लकुमार सादिगले व जिल्हा पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments