सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर दि.१(क.वृ.): सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर प्रदेश येथील हाथरस मधिल मनिषा वाल्मीकी हिच्यावर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या चारी नराधमाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व फाशी देण्यांत यावी निवेदनाद्वारे मागणी.
उत्तर प्रदेश येथील हाथरस मधिल मनिषा वाल्मीकी या दलित भगीनीवर अमानुषपणे अत्यांचार करुन चार नराधमांनी अमानुषपणे बलात्कार केला आणि नंतर तिने याची बाहेर कुठेही वाच्यता करुनये म्हणुन निर्दयीपणे तिची जीभ कापून टाकली याचा सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जाहिर निषेध करुन मा.जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यांतले आले.
मनिषा वाल्मीकी हिच्यावर चार नराधमांनी बलात्कार केला यांतच ती मृत्यूंशी झुंज देत मृत झाली. आरोपिंना कठोर शासन होणेसाठी व लवकरांत लवकर मनिषा हिस न्याय मिळणेसाठी हा खटला जलदगती न्यायांलयांत चालवून चारी नराधमांस फाशीची शिक्षा द्यावी तसेच पिडीतेच्या कुटूंबियास अंतिम संस्कार करणे नाकारलेल्या पोलीस अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करावे अशी मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमा चिंचोळकर यांनी केली. या अशा आशयाचे निवेदन आर.डी.सी. यांना देण्यांत आले.
यावेळी प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, संध्या काळे, सुमन जाधव, शोभा बोबे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, श्रृती अग्रवाल, संतोषी गुंडे आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
0 Comments