Hot Posts

6/recent/ticker-posts

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना तत्काळ द्या, वंचित बहुजन आघाडीचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना तत्काळ द्या, वंचित बहुजन आघाडीचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

कुर्डुवाडी(कालीदास जानराव) दि.१(क.वृ.): सबंध देशावाशीयांचे ह्रदय हेलावून सोडलेल्या हाथरस (उत्तर प्रदेश)येथे १४ सप्टेंबर रोजी वीस वर्षीय मनीषा वाल्मिकी हिच्यावर काही नराधम गुन्हेगारांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या शरीराची अवहेलना केली. या निंदनीय कृत्यात तिचा मृत्यू झाला.सदर घटना अतिशय क्रूर आणि अमानवी असून वंचित बहुजन आघाडी या घटनेचा तीव्र निषेध करत याप्रकरणी संबंधित अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यापक स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे निवेदन कुर्डुवाडी प्रांताधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले.नायब तहसीलदार मुसळे यांनी हे निवेदन स्वीकारले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा महासचिव माढा विभाग विशाल नवगिरे,कार्यकारणी सदस्य राहुल चव्हाण, विशाल मिसाळ, रणजीत गायकवाड, आबासाहेब हिवाळे, गणेश खरात, दयानंद जानराव, किरण कांबळे, राजू वाघमारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments