Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी तालुका ओला दुष्कळी जाहीर करा

बार्शी तालुका ओला दुष्कळी जाहीर करा

बार्शी दि.१९(क.वृ.): अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ओला दुष्काळ जाहीर करा या मुख्यमागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.  आंदोलन दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आले.

या आंदोलनात पुढील मागणी करण्यात आल्या, बार्शी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,  पिकांची, अवजारांची नुकसान भरपाई डी आर एफ वन एस.डी.आर.एफ यांचे निकष बदलून झाली द्या, सोयाबीन, तसेच इतर पिकांना  प्रतिहेक्‍टरी पंचेचाळीस हजार रुपये तातडीने मदत करा,घराचे व शेतीचे विज बिल पूर्ण माफ करा, रेशन धान्य मिळावे,ओढे-नाले फुटलेले आहे त्याची दुरुस्ती  व्हावी,रस्ते महापुराने वाहून गेले आहेत त्यांची दुरुस्ती  व्हावी, श्रीपत पिंपरी येथील ओढ्यावरील पुलाची उंची वाढवावी, 2019 -2020 मधील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी द्या, बँकांकडून त्वरित कर्ज पुरवठा करा, पिक विमा मिळावा,पंचनाम्याचे घोडे नाचवत बसण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांची सरसकट मदत व्हावी, ज्या साखर कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम दिली नाही ती त्वरित मिळावी, चालू गळीत हंगामातील उसाला पाच हजार रुपये प्रमाणे प्रति टन भाव मिळावा. आंदोलनाची निवेदन आणि मा. तहसीलदार यांनी स्वीकारले.

हे आंदोलन तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.  यावेळी लक्ष्मण घाडगे, प्रवीण मस्तूद, बाळासाहेब जगदाळे, अनिरुद्ध नकाते, भारत भोसले, पवार,शिवाजी घाडगे, बालाजी ताकभाते, सुभाष पिंगळे, पवन आहिरे, शापीन बागवान, बालाजी शितोळे, हरीभाऊ घाडगे, दत्तात्रय जगदाळे, पैगंबर मूलाणी, तानाजी काकडे, रामेश्वर शिकेतोड आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments