Hot Posts

6/recent/ticker-posts

परतीच्या पावसाने मोहोळ तसेच तालुक्यातील बागांचे अतोनात नुकसान

परतीच्या पावसाने मोहोळ तसेच तालुक्यातील बागांचे अतोनात नुकसान


मोहोळ दि.१६(क.वृ.) : दोन दिवसापासून परतीच्या पावसाने मोहोळ तसेच तालुक्यातील गावांमध्ये रात्री सुरू झालेला जोराचा पाऊस   दूपार पर्यंत चालूच होता. या पाऊसामुळे सर्व शेतामध्ये पाणीच पाणी साचले असून फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळीच्या बागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. केळीचे पिके हाताशी आलेली असताना अचानक आलेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण केळी बागेचे नुकसान झालेले आहे तसेच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने एवढ्या मोठा प्रमाणात फवारणी खर्च केला असूनही द्राक्षबागा हातचे जाण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात आहे.
कांदा,मका,भाजीपाला आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.
 डाळिंब ,द्राक्षे पिकांचे बहार धरणे ,पानगळ करणे ही कामे या मोसमात होत असतात पण या पावसामुळे या भागातील  डाळिंबाची कळी पुर्ण पणे गळाली आहे.या बागाना दुसरा बहार धरण्या शिवाय पर्याय नाही. द्राक्षे पिकांवर दावण्या, कुजवा आदी रोगाची लागण होत आहे .दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या पाऊस व वाऱ्याने पिकांची  मोठी हानी झाली असुन शेतकरी हतबल झाला आहे.या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

वरकुटे परिसरात पावसाने मोठी हानी.वरकुटे ,औंढी ,सौदंणे ,शेजबाभुळगाव ,टाकळी सिकंदर ,अंकोली आदी परिसरात परतीच्या पावसाने मोठी हानी केली आहे.  

Reactions

Post a Comment

0 Comments