पासलेवाडी परिसरात बाळराजे पाटील यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाईची केली मागणी

मोहोळ दि.१६(क.वृ.) : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला असून शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात गेलीच मात्र जमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे युवा नेते लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि प सदस्य बाळराजे पाटील यांनी आज सकाळी पासलेवाडी सह अन्य प्रत्यक्ष पाणी साठलेल्या भागात प्रत्यक्ष पाण्यात उतरत पूरपरिस्थिती पाहणी केली. माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासकीय उपाययोजनांची वाट न पाहता आपापल्या गावात पुरात अडकलेल्या लोकांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत माणुसकीच्या भावनेने सुरक्षित ठिकाणी हलवत मदत केली. सीना नदी काठावरील अनेक गावांमध्ये पाणी घुसल्याने या सर्वच गावांच्या पूरग्रस्तांच्या भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे बाळराजे यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीवरून मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे पंचनामे करून लवकरात लवकर या पूरग्रस्तांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातून भीमाने सीना या दोन्ही नद्यांना महापूर आल्यामुळे नदी काठावरील गावांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. हे वर्ष अवकाळी पावसाच्या नुकसानीतच गेल्यामुळे कष्टकरी बळीराजा पुरता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सध्या नुकसान झालेल्या सर्व घरांचे, पिकांचे, वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाईसाठी महसूल प्रशासनाकडून त्वरित मिळावे यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या सहकार्याने आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहोत.बाळराजे पाटील चेअरमन लोकनेते शुगर
0 Comments