काक्रंबा येथे सेनेचे जागरण गोंधळ आंदोलन

तुळजापूर दि.१(क.वृ.): तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे गुरुवार दि.1 रोजी शिवसेनेच्या वतीने भाजप केंद्र सरकाराने घातलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णया विरोधात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या फोटाला कांद्याचा माळा घालण्यात आल्या होत्या. या आंदोलनाचे निवेदन स्विकारण्यास मंडळअधिकारी कुलकर्णी यांनी स्विकारले.
तसेच या आंदोलनात उपतालुका प्रमुख रोहीत चव्हाण युवासेनेचे लखन कदम परमेश्वर, तुळजापूर उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, चेतन बंडगर कालिदास सुरवसे, भारत पाटील, उमेश खांडेकर, शाम माळी, शहाजी नन्नवरे, बालाजी पांचाळ शंकर गव्हाणे,राजेंद्र म्हंकराज,शाहूराज लोखंडे,सचिन सोनवणे, सोमनाथ सुरवसे, दिपक भिसे सिद्राम कारभारी, जितेंद्र माने, अक्षय काळे, स्वपनिल जटाळ, राम घोगरे, विनोद साबळे, नितेश माने, प्रवीण क्षीरसागर, तसेच या आंदोलनास भिम आण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने लेखी पञ देऊन पाठींबा दिला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे,अशोक जाधव,किशोर साठे, दत्ता भाजे, युवराज भिसे, आदी पदाधिकारी उपस्थित होते व शेतकरी वर्ग काक्रंबा ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments