Hot Posts

6/recent/ticker-posts

रयत क्रांती संघटनेच्या निवेदनाला यश

 रयत क्रांती संघटनेच्या निवेदनाला यश

लऊळ (कालीदास जानराव) दि.१(क.वृ.): रयत क्रांती संघटनेच्या वतीने मागेल त्याला शेततळे याचे २०१८ पासूनचे जवळपास तीन कोटी रखडलेले अनुदान मिळण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांना मागणी निवेदन देण्यात आले होते. शेततळ्याचे रखडलेले अनुदान जमा करा अन्यथा आंदोलन अशा आशयाचे वृत्त दै. कटुसत्य मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. 

सदर निवेदन जिल्हा कृषी कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आले असून जिल्ह्यातील २२५८ शेततळ्याच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.त्वरीत अनुदान उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी दिले आहे. या आशयाचे पत्र रयत क्रांती संघटनेचे पंडित साळुंके याना देण्यात आले आहे. याप्रसंगी संतोष कवले, सागर चव्हाण यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments