Hot Posts

6/recent/ticker-posts

केवड येथील आश्रमशाळेतील शिबीरामध्ये ३५ जणांनी केले रक्तदान

केवड येथील आश्रमशाळेतील शिबीरामध्ये ३५ जणांनी केले रक्तदान

माढा, दि.४(क.वृ.):- माढा तालुक्यातील केवड येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त व संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सध्याच्या भयंकर कोरोनाच्या संकटाच्या काळात रक्तसंकलन करण्याच्या उद्देशाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३५ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

या रक्तदान शिबीराचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थापक सचिव महारुद्र चव्हाण व प्रमुख पाहुणे मनोज लटके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव गायकवाड होते.

यावेळी सहशिक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की,सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात रक्तदान हे खूपच महत्त्वाचे असून त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तींला मोलाची मदत होवू शकते त्यामुळे रक्तदान ही एक सामाजिक चळवळ बनावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी कलाशिक्षक गणेश जोशी यांनी वाढदिवसानिमित्त रेखाटलेले पेन्सिल स्केच सचिव महारुद्र चव्हाण यांनी भेट दिले.या शिबीरासाठी बार्शीच्या रामभाई शहा रक्तपेढीचे सहकार्य लाभले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण, मार्गदर्शक गणेश चव्हाण, कालिदास चव्हाण, मुख्याध्यापक कमलाकर साकळे, विनायक लोखंडे,नंदकुमार कापसे, प्रा. युवराज जगदाळे, सयाजी चौगुले,शिवाजी शिंदे,नरसेश्वर पाटील,दत्तात्रय काकडे, कृष्णा घाडगे, मंगेश गुरव, लक्ष्मण कदम,नितीन सलगर,नितीन कांबळे, वीरेंद्र मोरे, सरिता चव्हाण,साधना घोंगडे, अमृता खेडकर, मोहिनी मारकड,मनिषा खडतरे, मोनिका चव्हाण, धनाजी मारकड, हनुमंत मारकड, संतोष भुसारे, कृष्णा घुले, अनुरथ लटके, गणेश मारकड, जनार्धन डांगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments