हाथरस येथील घटनेचा लोटेवाडी येथे निषेध

सांगोला दि.४(क.वृ.):- हाथरस येथील पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी लोटेवाडी ता सांगोला येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार, मोदी सरकार,गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.आणि या घटनेचा निषेध व्यक्त केला.
लोकशाही देशातील हाथरस येथील घटना समाजमनाला विचारमंथन करायला लावणारी असून या घटनेने संपूर्ण देश भयभीत झाला आहे. दोषी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे,जेणेकरून अशा घटना या पुढील काळात तर घडता घडू नयेत,असे मत सामाजिक कार्यकर्ते दादा सावंत यांनी लोटेवाडी ता --सांगोला येथे व्यक्त केले. यावेळी मोदी सरकार,योगी सरकारचा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी सुहास सावंत,अण्णा सावंत, राहुल सावंत, अक्षय सावंत, अशोक गडहिरे, बिरुदेव साठे, साईराजबनसोडे, अभिजीत बनसोडे, दादा सावंत, गणेश सावंत,शहाजी सावंत आदि उपस्थित होते.
0 Comments