'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सोलापूरात सुरू

सोलापूर दि.३(क.वृ.):- सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस आयुक्तालय आणि सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सकाळी सहा वाजता होम मैदान येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सोलापुरातील सर्व शहरवासीयांना व सायकल प्रेमींनी या सायकल रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. रविवारी सकाळी 6:00 वाजता सोलापूर महापालिका व सायकलिस्ट फाऊंडेशन, विमल सेल्स, सोलापूर आणि महसूल कर्मचारी अधिकारी तर्फे एक संडे राईड सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्टार्ट पॉईंट स्मार्ट सिटी पॉइंट, होम मैदानाजवळ (हरिभाई देवकरण प्रशाला समोर) येथे उद्या (रविवारी) सकाळी 5.30 वाजता स्वतःची सायकल घेऊन यावे आणि तुळजापूर रोडवर तामलवाडी टोल नाका रिटर्न राईड करायचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.आहे. या कार्यक्रमात झुवारी सिमेंटच्या वतीने सी.एस.आर फंडातून टी-शर्ट आणि कॅप देण्यात येणार आहे. सोलापूर मधील सायकल विक्रेते, विमल सेल्स तर्फे तामलवाडी टोल प्लाझा येथे चहा, बिस्किटे ची सोय करण्यात येईल. तरी सर्वानी या रैली मध्ये सहभाग नोंदवावा अशी माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
0 Comments