श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञोत्सवा पुर्वीचा मंचकीनिद्रैस आरंभ

तुळजापूर दि.१०(क.वृ.):- श्रीतुळजाभवानी भवानी मातेच्या शारदीयनवराञउत्सव पुर्वीच्या मंचकि निद्रेस शुक्रवार दि.9 रोजी राञी आरंभ झाला. ही मंचकीनिद्रा अश्विनशुध्दशके1942 शनिवार दि१७रोजी पहाटे संपणार असुन देवी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापीत,केल्यानंतर दुपारी बारा वाजता घटस्थापना करण्यात येवुन शारदीयनवराञोत्सवास आरंभ होणार आहे.
ही मंचकीनिद्रा नऊ दिवसाची आहे. अश्विन वध ७ सह ८ शके 1942 शुक्रवार 9 रोजी सकाळी प्रथमता गणेश ओवरीत देवीच्या गादीचा कापुस आणण्यात आला. त्यानंतर मंदीरातील महिला सुवासनीं कर्मचारी नी कापसाचे पुजन करुन ऐकमेकीना पाणाचे विडे देउन भक्ती पुर्वक कापुस वेचण्यास पारंभ झाला तो संपल्यानंतर मुस्लीम धर्मिय पिंजा-याने तो पिंजून दिला. नंतर तो गादीत भरल्या नंतर निकतेनी त्या गाद्या शिवल्या नंतर पलंगाचे सेवेदार पलंगे कुंटुंबियांनी यांनी प्रथम चांदीचा पलंग रांगोळी ने घासुन चकचकीत केला .त्यानंतर त्यावर खालच्या बाजूस नवार पट्ट्या अथंरल्यानंतर त्यावर तीन गाद्या तसेच पायथ्या व उशाला पांढरे लाल मखमली पलंग पोस अंथरुन देवीच्या पायय्था उशाशी लोंढे ठेवण्यात येवुन चार वाजता देवी निद्रेसाठी शेजघर तयार करण्यात आले.
नंतर सांयकाळी अभिषेक पुजेची घाट झाल्यानंतर दहीदुधपंचामृतअभिषेकपुजा आरंभ होवून त्या संपल्यानंतर मुर्ती स्वछ करण्यात आली नंतर खंडोबाचे पुजारी सेवेकरी यांनी दिलेला भंडारा देवीचा अंगावर सर्वञ लावण्यात आला. नंतर मुर्ती शेजघरात आणल्यानंतर पलंगावर निद्रस्त करण्यात आली त्यानंतर प्रथम घुग-यांचा नैवध दाखविण्यात आला नंतर धुपारती करण्यात आली यावेळी देविचे मंहत भोपेपुजारी मानकरी सेवेकरी विश्वस्त सह मांदीर अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.
देवीच्या वर्षभरातुन 21दिवस निद्रा !
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतु
मुस्लीम धर्मिय नदाब कडे कापुस पिंजण्याचा मान !
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतु
0 Comments