Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा.डॉ.संतोष कदम यांची व्यावसायिक अर्थशास्त्र मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

प्रा.डॉ.संतोष कदम यांची व्यावसायिक अर्थशास्त्र मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

माढा दि.११(क.वृ.):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व सध्या मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात कार्यरत असणारे प्रा.डॉ. संतोष नागनाथ कदम यांची सोलापूच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या व्यावसायिक अर्थशास्त्र मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

डॉ.संतोष कदम हे विठ्ठलवाडी सारख्या छोट्या खेड्यातील असूनही त्यांनी भरपूर अभ्यास आणि संशोधन वृत्तीच्या जोरावर अभ्यासक्रमातील 23 पुस्तके, संशोधन ग्रंथ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमध्ये 50 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विद्यार्थ्यांनी संशोधन करून पी एचडी पदवी संपादित केली आहे. सध्या 6 विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे विठ्ठलवाडी गावाच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष पी.एल.कोळी, प्राचार्य डॉ.बी.एम.भांजे, उपशाखापमुख मोहन कदम, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, डॉ.किशोर गव्हाणे, समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नागटिळक, उपशिक्षणाधिकारी नितेश कदम,उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, सहव्यवस्थापक अंकुश डुचाळ, पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, चेअरमन अनिलकुमार अनभुले, सरपंच अरुण कदम, उपसरपंच अनिलकुमार बरकडे, क्षयरोग अधिकारी डॉ.मोहन शेगर, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे,पोलीस पाटील बालाजी शेगर,हनुमंत पाटील, प्रा.हनुमंत कदम,प्रा.कुंडलिक गुंड, प्रा.भिमराव माने, डॉ.नेताजी कोकाटे,शिवाजी कदम,सौदागर गव्हाणे,रामचंद्र भांगे,राजाभाऊ कदम,महावीर बरकडे,नेताजी उबाळे,सतीश गुंड,सज्जन मुळे, दिनेश गुंड, सोमनाथ खरात, गोरखनाथ शेगर, समाधान कोकाटे, सौदागर खरात, भिवाजी जाधव, ब्रम्हदेव खैरे, कैलास सस्ते यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments