Hot Posts

6/recent/ticker-posts

शेकडो सफाई कामगारांना दिपकआबांनी मिळवून दिला न्याय !

 शेकडो सफाई कामगारांना दिपकआबांनी मिळवून दिला न्याय !


सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन आबांच्या मध्यस्थीने अखेर सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन मागे

सांगोला दि.३(क.वृ.): दैनंदिन पगार वाढ, यापूर्वीचा प्रॉव्हिडंट फंड व अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी सांगोला नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले होते त्यांनी आपल्या समस्या राष्ट्रवादीचे राज्याचे नेते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यापुढे मांडल्या यावेळी तात्काळ त्याचा पाठपुरावा करून सर्व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत गेल्या तीन दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न दिपकआबांनी तात्काळ मार्गी लावला.

शनिवार दि.३ रोजी सांगोला नगरपालिकेतील सर्व सफाई कामगार येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर उपस्थित राहून त्यांनी आपली गार्‍हाणे दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासमोर मांडले यावेळी क्षणाचाही विलंब न करता आबांनी तात्काळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून आणि संबंधित विभागाचे ठेकेदारांना समोर बोलावून सफाई कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्यास सांगितले. नगरपालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रॉव्हिडंट फंड संबंधित ठेकेदारांकडून प्रलंबित आहे तो कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळावा तसेच नवीन ठेकेदारांनी पगारात वाढ करावी व प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या या खात्याची पुस्तिका व खाते नंबर मिळावा यांसह अन्य मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंदचे हत्यार उपसले होते सलग तीन दिवसांपासून सफाई कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ लागला होता ही बाब लक्षात घेऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सफाई कर्मचारी संबंधित विभागाचे ठेकेदार आणि नगरसेवक सोमनाथ लोखंडे, सतीश सावंत,जुबेर मुजावर, अनिल खडतरे, रफिक तांबोळी, अस्मीर तांबोळी, प्रताप मस्के, आनंद घोंगडे, ॲड. संपत पाटील आदींसह कर्मचाऱ्यांचे नेते अक्षय बनसोडे व महादेव बनसोडे तसेच इतरांना विश्वासात घेऊन आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व नगराध्यक्षा व गटनेते आनंद माने यांच्याशी चर्चा करून सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने कसा मार्ग काढता येईल याचा सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रयत्न केला. यानुसार तात्काळ त्यांचा प्रलंबित प्रॉव्हिडंट फंड लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल तसेच नवीन ठेकेदारांकडून कर्मचार्‍यांच्या मागणीप्रमाणे दैनंदिन 350 रुपये मजुरी देण्यात येईल व सर्व सफाई कर्मचाऱ्यांना स्वतंत्र खाते नंबर आणि त्याचे पुस्तक देऊन दैनंदिन कामात पारदर्शकता आणण्याच्या अटीवर हा संप मागे घेण्यात आला.

गेल्या तीन दिवसांपासून नगरपालिका आणि सफाई कर्मचारी यांच्यात सुरु असलेला हा लढा अखेर दिपकआबांनी सोडवल्यामुळे सांगोला शहरवासीयांची होणारी गैरसोय थांबण्यास मदत होणार आहे. प्रशासन व संबंधित ठेकेदारांकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्याबद्दल सफाई कर्मचाऱ्यांनी दिपकआबा यांचे विशेष आभार मानले.

कर्मचार्‍यांचा आनंद गगनात मावेना..!
गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या बहुतांशी सर्व कर्मचाऱ्यांना आपला खाते क्रमांक माहित नव्हता शिवाय ठेकेदाराकडे अनेक वर्षांपासून प्रॉव्हिडंट फंड तसाच पडून होता याबाबत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याशी चर्चा करून सर्व कर्मचाऱ्यांना खाते क्रमांक व  खाते पुस्तिका देण्यास सांगितले व थकित प्रॉव्हिडंट फंडची रक्कम कुणाला किती मिळणार आहे याचीही माहिती देण्यास सांगितले यावर मुख्याधिकारी केंद्रे यांनी सोमवारी सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे दूरध्वनीवरून आश्वासन देताच उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता यानिमित्ताने सफाई कर्मचाऱ्यांचा वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
Reactions

Post a Comment

0 Comments