Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. शहाजीबापू पाटील यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने रक्तदान सप्ताहाचे आयोजन

 आ. शहाजीबापू पाटील यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने रक्तदान सप्ताहाचे आयोजन

सांगोला दि.५(क.वृ.):- देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सांगोला विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने तालुक्यात रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सदरच्या रक्तदान शिबिरामध्ये सर्व नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

भारत देश हा सध्या कोरोना सारख्या भयानक आजाराशी झुंज देत असून कोरोना बाधित रुग्णांसाठी मोठ्याप्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सदरचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेऊन सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान सप्ताहामध्ये गुरुवार दि.  ८ ऑक्टोबर रोजी हातीद येथे, शुक्रवार दि.9 ऑक्टोबर रोजी वाटंबरे येथे, शनिवार दि.10 ऑक्टोबर रोजीपळशी येथे, रविवार दि.11 ऑक्टोबर रोजी मेडशिंगी येथे, सोमवार दि.12 ऑक्‍टोबर रोजी एखतपूर, मंगळवार दि.13 ऑक्टोबर रोजी वाडेगाव येथे व बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी चिकमहुद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आले   आहे.  संबंधित सर्व ठिकाणच्या  रक्तदानाची वेळ स. ९ ते सायंकाळी ४ पर्यंत ठेवण्यात अली आहे. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास संयोजकांच्या वतीने हेल्मेट किंवा पाण्याचा जार भेट दिला जाणार आहे.  तरी कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी व भारतात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सांगोला तालुक्यातील तमाम जनतेने सदरच्या रक्तदान सप्ताहामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments