Hot Posts

6/recent/ticker-posts

हाथरस बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन तर रिपाइंचे निदर्शने

हाथरस बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन तर रिपाइंचे  निदर्शने


तुळजापूर दि.५(क.वृ.):- उत्तर प्रदेश, हाथरस येथील तरुणीची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले तर रिपाईने निवेदन देवुन तुळजापूर तहसिलदार  निदर्शने करण्यात आले.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,हसरथ जिल्ह्यातील तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणे ही घटणा मानवतेला काळीमा फासणारी असून या निंदनीय घटणेचा आम्ही   जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत मुलीच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला विश्वासात न घेता बेरात्री तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करणाऱ्या संबंधित पोलीस आधिकारी व कर्मचारी यांना त्वरित निलंबित करावे असी मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस च्यावतीने, ज्येष्ठ नेते धनंजय पाटील, दिलीप मगर, खंडु जाधव, अशोक जाधव शहराध्यक्ष अमर चोपदार, मकसुद शेख, संदिप गंगणे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा सरचिटणीस शशी नवले,युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तौफिक शेख, अप्पासाहेब गणेश नन्नवरे, समर्थ पैलवान, अभय माने, रोहीत चव्हाण, आकाश चोपदार उपस्थित होते.  

रिपाई वतीने निदर्शने..
रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, कार्याध्यक्ष बाबसाहेब मस्के,विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तालुका सरचिटणीस केतन (मुन्ना) कदम,तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम,तुळजापूर युवा तालुका सरचिटणीस शुभम कदम,रिपाइंचे, बाळु शिंगे (वडार समाज अध्यक्ष),अरुण आप्पा कदम, बि.आर.एस.पी अध्यक्ष), राज कदम, प्रथ्वीराज कदम, हिरा भालेकर, बाळासाहेब कदम,संजय कदम, भोलानाथ कदम, योगेश सोनवणे, विजय गायकवाड, नाशिकेत कांबळे, तात्या हावळे,बाळु दुपारगुडे,हामीद बेग,भुजंग देवकुळे,शैलेश कदम सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments